
Tejaswini Pandit Struggle Story : तेजस्विनी पंडितने अनेक सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. मात्र, इंडस्ट्रीतील तेजस्विनीचा हा प्रवास सोपा नव्हता. आज तेजस्विनीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने अभिनेत्रीच्या संघर्षाच्या काळाबद्दल जाणून घेऊया. अभिनेत्रीला तिच्या संघर्षाच्या काळात वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं, त्याबद्दल तिनं मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं.
मुंबई – मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजपर्यंत अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय आणि अजूनही करतेय. अभिनेत्रीपासून ते निर्मातीपर्यंतचा तेजस्वीचा प्रवास साधा-सोपा नव्हता. तेजस्विनी स्वतःच्या हिंमतीवर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. अभिनेत्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला. आज तेजस्विनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या स्ट्रगलबद्दल जाणून घेऊया.
तेजस्विनीने ‘अथांग’ या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. या वेब सीरिजनिमित्त तेजस्विनीने सौमित्र पोटेच्या पॉडकास्टला मुलाखत दिलेली. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं तिच्या संघर्षाचा काळ सांगितला आहे. एका नगरसेवकाने तेजस्विनीसोबत वाईट वागणूक केलेली, याबद्दल अभिनेत्रीनं भाष्य केलं होतं.
तेजस्विनी म्हणालेली की, ‘मी सिंहगड रोडला राहायचे. तेव्हा सिंहगड रोड येथील नगरसेवकाच्या एका घरी मी भाड्याने राहत होते. घराचं भाडं देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या मी ऑफिसला गेले होते. तेव्हा मला असं कळालं की, या लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. कारण एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं किंवा दुसरे आंबे नासके आहेत का? हे बघितलं जातं.’