सरकारी वा निमसरकारी कामासाठी आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्र देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे ही सगळी कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.. मात्र, बऱ्याचदा नजरचुकीने ती गहाळ होतात नि डोक्याला हात लावण्याची वेळ येते..मतदार ओळखपत्र हरवल्यास काय करायचे, असा प्रश्न पडला असेल, तर नो टेन्शन..! आता घरबसल्या तुम्हाला नवे मतदार ओळखपत्र काढता येते. त्यासाठीची प्रोसेस जाणून घेऊ या..*डुप्लिकेट वोटर कार्डची प्रोसेस*▪️ डुप्लिकेट मतदार ओळखपत्र पुन्हा काढण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा. तेथे तुमचे खाते तयार करा नि लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला ‘e-EPIC’ डाऊनलोड करावे लागेल.▪️ नंतर तुमचा ‘e-EPIC’ क्रमांक किंवा संदर्भ क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर डिजिटल कार्ड डाऊनलोड करू शकता.▪️ तुमच्या कार्डवर नोंदणीकृत क्रमांक वेगळा असेल, तर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी प्रथम तुम्हाला ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.▪️ ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण होताच नोंदणीकृत नंबरवर मेसेज येईल. त्यानंतर डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.▪️ डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी काही तपशील द्यावे लागतील. त्यात पूर्ण नाव, राज्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि अर्ज करण्याचे नेमके कारण टाकावे लागेल. मतदार ओळखपत्र हरवले वा चोरी झाले असेल, तर पोलिसांत तक्रार करुन त्या ‘एफआयआर’ची प्रत द्यावी लागेल.
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली;
नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप आमदार रामाची जागा,...
दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात तीन डबल डेकर फ्लायओव्हर्सचा प्रस्ताव दिला आहे. मार्ग तपासा
दिल्लीचे अर्थमंत्री कैलाश गहलोत यांनी बुधवारी 2023-24 साठी 78,800 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक सादर केला. जाहीर केलेल्या विविध...
महत्वाच्या विविध घडामोडी
*अहमदनगर जिल्ह्यात आज पहिली सहकार परिषद:* देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज शनिवारी प्रवरानगर, लोणी येथे देशातील पहिली सहकार...






