घरगुती वादातून पतीचा थरार ..कुऱ्हाडीचा घाव घालुन पत्नी ठार !
श्रीगोंदा प्रतिनिधी कायम होणाऱ्या घरगुती भांडणाच्या रागातून आपल्या पत्नीच्या गळ्यावर,दंडावर,हनुवटीवर,कपाळावर, तोंडावर कुऱ्हाडीने वार करत तिला जीवे ठार मारल्याची घटना काल पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपळगावपिसा या गावात घडली आहे.
संगीता रोहिदास पंधरकर वय५७ असे मयत महिलेचे नाव आहे तर रोहिदास भिकाजी पंधरकर असे खून करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे सदर आरोपीला बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे






