घडामोडी

    412

    १)मोदींना पर्यायावर कन्हैयाकुमार म्हणाले; आजाराला पर्याय नसतो त्यावर इलाज करतात*देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय पर्याय काय असा प्रश्‍न विचारला जातो. मात्र, कोणत्याही आजाराला पर्याय विचारला जात नाही तर त्यावर इलाज केला जातो हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे सांगत कोरोनावरदेखील इलाज म्हणून लस शोधण्यात आल्याचे उदाहरण कॉंग्रेसचे युवा0 नेते कन्हैयाकुमार यांनी आज दिले*२)परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा*’विलीनीकरणाबाबत स्वतंत्र निर्णय घेवू शकत नाही’ ‘सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेवू”सोमवारपर्यंत न आल्यास कठोर कारवाई करणार असा इशारा परब यांनी दिला.*३)न्यायालयाची नवाब मलिकांनी मागितली बिनशर्त माफी*मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो – नवाब मालिकांची कोर्टात हमी*४)कॅटरिनाने विवाहबंधनात मात्र यांना नाही दिले निमंत्रण*बॉलीवूडमधील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ काल अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे धुमधडाक्यात लग्न केले. या लग्नाला १२० पाहुणे उपस्थित होते. *असं म्हटलं जात की, व्यक्तीगत आयुष्यात ज्यांच्यामुळे त्रास झाला अशा दिपीका पडूकोन, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर, सलमान खान व शाहरुख खान यांना मात्र लग्नाला सांगण्याचे तिने टाळल्याचे दिसून आले.*

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here