घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी हायकोर्टाचा ‘हा’ महत्वाचा निर्णय
मुंबई : घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचार संबंधित (Divorce and domestic violence) दोन स्वतंत्र प्रकरणांची एकत्रित सुनावणी (case hearing together) घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) एका प्रकरणात परवानगी दिली आहे. वांद्रे न्यायालयात (Bandra Court) आणि गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात पत्नीने केलेल्या दोन्ही दाव्यांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी पतीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. (Mumbai high court decision on women’s divorce case and domestic violence)दोन्ही न्यायालयांत वेगवेगळ्या सुनावणीमुळे बराच कालावधी लागतो. तसेच दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे घटस्फोटाची कार्यवाही लवकर होऊ शकेल, असे पतीने याचिकेत म्हटले होते.न्या. सी. व्ही. भडंग यांनी ही मागणी मान्य केली आहे. पत्नीने पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार केली आहे. त्यावर कनिष्ठ न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका करण्याची आवश्यकता नाही, असा दावा पत्नीच्या वतीने करण्यात आला होता.