ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय ३५) यांचा शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाला.
येथील यशवंत कॉलनी तील निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळल्या. दरम्यान त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्यात कालपासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
मृत्यूचे कारण नेमके समजले नसल्याने चर्चाना उधाण आले होते. मात्र नुकतेच या मृत्यू प्रकरणाचा खुलासा झाला आहे. गाैरी गडाख यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले असल्याचे अपर पोलिस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी गाैरी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला होता. त्यांना नगरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु त्या मृत झाल्या असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. त्याचा प्राथमिक अहवाल आला असून, त्यात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.