गौरी गडाख यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार!

सोनई । प्रतिनिधी

गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनईतल्या  वांबोरीरस्त्यालगतच्या गडाख स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुतणे उदयन गडाख यांनी त्यांना मुखाग्नि दिला.

यावेळी राज्याचे मृद आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डाॅ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनिल गडाख, अहमदनगरचे आ. संग्राम जगताप, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींसह गडाखांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी तीनच्या सुमारास गौरी यांचं पार्थिव औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून सोनईत आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान,

या अंत्यविधीसाठी लोणी परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा तालुक्यातून गडाख कुटुंबियांवर प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्मशानभूमीला पोलीस छावणीचं स्वरुप!

गौरी गडाख यांच्या आकस्मिक निधनानं सोनई गावावर शोककळा पसरलीय. त्यामुळे आठवडी बाजार वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. नवा वांबोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या अंत्यविधीस्थळी मोठा जमाव उपस्थित होता. या परासराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here