गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित

388

Covid 19 India Cases : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 327 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान दिवसागणिक वाढत आहे.

देशात सध्या एकूण 5 लाख 90 हजार 611 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबळींची संख्या 4 लाख 83 हजार 790 इतकी झाली आहे. सध्या रुग्णावाढीचा दर 10.21 आहे.

दुसरीकडे, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या देखील वाढत असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढून 3623 झाली आहे. 28 राज्यांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 1009 रुग्ण आढळले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली 513 रुग्ण आणि कर्नाटकमध्ये 441 रुग्णांची नोंद झाली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 151 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी 89 लाख 28 हजार 316 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 151 कोटी 57 लाख 60 हजार 645 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील 91 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 66 टक्के लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात, 15-17 वयोगटातील 22 टक्के किशोरांना अँटी-कोविड-19 लसींचा पहिला डोस मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here