गेट वेल सून’! संजय दत्त उपचारार्थ परदेशात!
मुंबई : अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असता कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले.
दि. ८ ऑगस्ट रोजी संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. संजय दत्तने कॅन्सरवर उपचार सुरु केले होते. दरम्यान संजू बाबा पत्नी मान्यता दत्तसोबत अचानक मुंबई सोडून परदेशात गेला असल्याचे समोर आले आहे.
१५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला आहे. संजू बाबा त्याच्या मुलांना, शहरान आणि इकरा यांना ‘मिस’ करत असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तो दुबईला गेला असल्याचे म्हटले आहे. संजय दत्त पुढचे सात ते दहा दिवस मुलांसोबत घालवणार असल्याचे म्हटले जात आहे. आहे.