
गुवाहाटी (आसाम): रविवारी रात्री उशिरा गुवाहाटी येथील जलुकबारी परिसरात झालेल्या एका रस्ता अपघातात किमान सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी फोनवरून एएनआयला सांगितले की, अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
ठुबे प्रतीक विजय कुमार म्हणाले, “प्राथमिक तपासणीनुसार, आम्हाला आढळले आहे की मृत व्यक्ती विद्यार्थी आहेत. ही घटना जलुकबारी परिसरात घडली.”