गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी म्हणाल्या,….

396

शिवसेना नेते (Shiv Sena) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालांशी केली होती. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं.दरम्यान त्यांनी यावर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आज खुद्द हेमा मालिनी यांनी देखील गुलाबराव पाटील याच्या वक्तव्याची दखल घेत, ‘अशाप्रकरची वक्तव्य करण्याची सुरूवात लालू प्र्साद यादव यांनी केली आहे. पण अशाप्रकरच्या कोणत्याही महिलेवरून तुलनात्मक वक्तव्य करणं चूकीचं आहे. मी या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करते’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?”माझं चॅलेंज आहे 30 वर्षे आमदार राहिलेल्याला… या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नतर राजीनामा देईल.” तसेच पुढे म्हटलं, “अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता करा.” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं होत.दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलं होते की, “शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. हे सरकार गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी काढणार आहे का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here