गुलमोहर रोडवर धूमस्टाईल चोरी
अहमदनगर : शहरातील गुलमोहर रोडवरील जागृती कॉलनीमध्ये धूमस्टाईल चोरी करून 90 हजार रूपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शोभा भास्कर झावरे (वय 57, रा. जागृती कॉलनी, गुलमोहर रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवार दि. 5 ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या दरम्यान शोभा झावरे या रस्त्याने पायी घरी जात होत्या.
यावेळी दुचाकीवरून अज्ञात दोन चोरटे त्याच्याजवळ आले व त्यांनी झावरे यांच्या गळ्यातील 90 हजार रूपयांचे गंठण बळजबरीने ओढून तोडून नेले आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात झावरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भांदवि. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण सुरसे करत आहेत.




