गुप्तांग जाळले आणिडोक्याचा चेंदामेंदा.! तरुणीची निघृणहत्या, तरुणी अकोल्याचीकी संगमनेरची.! तपास सुरु..!

    269

    सार्वभौम (संगमनेर) :-संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका तरुणीचा नग्न आवस्थेत मृतदेह मिळुन आला आहे. या तरुणीचे गुप्तांग जाळले असून डोक्याच्या कवटीचा अक्षरश: चेंदामेंदा केला आहे. या तरुणशीची ओळख पटू नये म्हणून तिच्यावर ज्वलनशिल पदार्थ टाकल्याचा देखील संशय आहे. ही घटना आठवड्यापुर्वी केली असावी. मात्र, एका व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करुन पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालु होते.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालु होते.”याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंदनापुरी घाटात एक श्री. गणेशाचे मंदीर आहे. त्याच्या बाजुला एक डोंगर देखील आहे. तेथे एका मुलीचा मृतदेह अर्ध नग्न आवस्थेत असून डोक्याच्या कवटीचा पुर्ण चेंदामेंदा झालेला आहे. धड उताने पडलेले असून डोक्याची फक्त कवटी तेथे पडलेली असून गुप्तांग देखील एखाद्या ज्वलनशिल द्रवाने जाळल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. ही माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठले. ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते. ती वस्तुस्थिती होती. त्यामुळे, हा काही अकस्मात मृत्यु नसून कोणीतरी पुर्वनियोजित केलेली हत्या आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली.”दरम्यान, या गुन्ह्याची उकल होण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मुलीची ओळख पटणे गरजेचे होते. त्यामुळे, पोलिसांनी पंचमाना आणि पीएम करण्याची प्रोसिजर पार पाडली. जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयानक आणि मानुसकीला काळीमा फासणारा आहे. एखाद्या मुलीची अशा पद्धतीने करतेने हत्या करणे म्हणजे नक्कीच या घटनेला भावनिक वळण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही मुलगी कदाचित अकोले तालुक्यातील देखील असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, जर कोणाच्या घरातील, शेजारील, परप्रांतीय महिला किंवा मुलगी आठ पंधरा दिवस किंवा काही दिवसांपासून मिसिंग असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.तुम्ही तिला ओळखता का?”” तिच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल बाह्या असलेला टि शर्ट आहे, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उजवे मनगटात काळ्या मण्याचा दोरा, हाताच्या मधील बोटात अंगठी, उजव्या हाताच्या कांबिवर जय महाकाल व रुद्रा, माँ असे गोंधलेले तसेच त्रिशुल, डमरुचे चित्र गोंधलेले आहे. तर, उजव्या हाताच्या आंगठ्यावर ॐ असे गोंधलेले आहे. या मुलीचे वय १० ते ३० यादरम्यान असण्याची शक्यता आहे. तर, ही मुलगी शक्यतो अकोले किंवा संगमनेर तालुक्यातील असण्याची शक्यता. जर या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here