गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाही, चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय

गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाही, चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय

: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना ही कोठडी सुनावली आहे.

सातारा: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे.

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना ही कोठडी सुनावली आहे. खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2020मधील हे प्रकरण आहे.

सातारा पोलिसांनी (satara police) सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदावर्ते यांनी संभाजीराजे आणि उदनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्याविरोधात कुणाच्या सांगण्यावरून विधान केले होते, याचा कसून तपास सातारा पोलीस करणार आहेत.आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी सरकारी वकील अंजुम पठाण यांनी जोरदार युक्तिवाद करत सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सदावर्ते यांनी कुणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वशंज असल्याचा उल्लेख केला याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

त्यामुळे सदावर्ते यांची कोठडी देण्याची मागणी केली होती. तर सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिसांच्या नोटिशीच्या त्रुटी दाखवून त्यांना जामीन देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत तारीखच नाही.

त्यांच्याकडून काहीच रिकव्हरी करायची नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याचा युक्तिवाद सदावर्ते यांचे वकील सचिन थोरात यांनी केला होता. त्यांच्यासोबत सचिन थोरात, सतीश सूर्यवंशी, प्रदीप डोरे या वकिलांनीही सदावर्ते यांची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासासाठी कोठडी दिली

कोर्टासमोर सदावर्तेंना हजर करण्यात आलं. सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. जी काही घटना झाली ती निंदणीय आहे. त्याचा तपास होणं गरजेचं आहे असं आम्ही कोर्टाला ठणकावून सांगितलं. त्यामुळे कोर्टाने त्यांना चार दिवसाची कोठडी दिली.

आरोपीचं वागणं, शिस्त याची माहिती कोर्टाला दिली. त्यांच्या आवाजाचे नमूने घेण्याची गरज आहे.

त्यांना कोणी मदत केली का?

घटनास्थळी कोण होतं? आणि त्यांनी कोणत्या पुस्तकाचा आधार घेऊन विधान केलं याबाबत तपास करायचा आहे, असं कोर्टाला आम्ही सांगितलं. त्यामुळे त्यांना चार दिवसाची कोठडी देण्यात यावी अशी कोर्टाला विनंती केली, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.

सदावर्ते यांनी आमची कोर्टात माफी मागितली. सदावर्ते यांनी काही बाजू कोर्टाला सांगितलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here