गुणरत्न सदावर्तेंची अखेर जेलमधून सुटका,गुणरत्न सदावर्तेंची अखेर जेलमधून सुटका,

मुंबई; सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटक आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल गुन्हे यामध्ये तब्बल १९ दिवस फिरस्तीवर असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आज जेलमधून सूटका झाली आहे. चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला असल्याने त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली.शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात अटकेत असलेल्या एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 कामगारांना सत्र न्यालयाने २२ एप्रिल रोजी दिलासा दिला. न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी अ‍ॅड सदावर्ते यांना 50 हजारांच्या वैयक्तिक जाचमुचलका आणि तेवढ्याच रक्कमेचा हमीदार तर कामगारांना प्रत्येकी 10 हजाराच्या वैयक्तिक हमीवर जामिन मंजूर केला आहे.सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आंदोलकांना जामीन मंजूरशरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान सदावर्ते यांच्यासह अटकेत असलेल्या 115 एसटी कामगारांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले आहे. त्यावर न्यायाधिश आर.एम. सादराणी यांच्या समोर सुनावणी झाली.यावेळी कामगारांच्यावतीने अ‍ॅड नितीन सेजपाल यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एसटीचा संप मिटला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशा नुसार या कामगारांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर रहाणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजच त्यांची सुटका होणे आवश्यक आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना गेले सहा महिने आदोंलनामुळे ससेहोलपट झालेल्या एसटी कामगारांकडे मानवतेच्या दृष्टीकोणातून जामीन द्यावा अशी विनंती न्यायालयाला केली.गुणरत्न सदावर्ते यांचा घोटाळा हर्षद मेहतासारखातर सदावर्ती यांच्यावतीने गिरीश कुलकर्णी यांनी बाजू मांडताना सिल्व्हर ओकच्या घटनेसाठी सदावर्ते जबाबदार नाहीत. कामगारांकडून घेतलेली रक्कत ही त्यांच्याच चहापाणी , कागदपत्रे आणि न्यायालयाच्या कामकाजासाठी खर्च झाल्याने या चौकशीसाठी ताव्यात ठेवण्याची गरज नाही असा दावा करून जामीन देण्याची विनंती केली. याला सरकारच्यावतीने अ‍ॅड प्रदीप धरत यांनी जोरदार विरोध केला.सदावर्तेंनी एसटी संप काळात घेतलेल्या मालमत्ता आणि त्यांच्या बँक खात्यांचे लाखोंचे व्यवहार, घरी सापडलेली 35 संशयास्पद कागदपत्रे, दोन रजिस्ट्रर तसेच सीसीटीव्ही फुटेज इत्यादी पाहता त्यांची अधिक चौकशी होणे आवश्यक आहे. सदावर्तेंना कर्मचारी कामावर रुजू होऊ नये, असे वाटत होते. कारण, त्यांना अटक होताच हजारोच्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांना जामीन दिल्या ते पुन्हा कर्माचर्यांची माथी भडकावू शकतात, असा दावाही अ‍ॅड. घरत यांनी केला.अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा आगळावेगळा छंदतसेच कर्मचार्यांपैकी अभिषेक पाटीलची याप्रकरणी महत्वाची भूमिका होती. सच्चीदानंद पूरी आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांची केबल नेटवर्क आहे. पवारांच्या बंगल्यासह अन्य दोन ठिकाणी आंदोलन करण्याचा त्यांची योजना होती. मात्र, काही कारणांती ती पूर्ण होऊ शकली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्यांची ओळख पटली असल्याचा दावा अ‍ॅड. घरत यांनी करत जामीनाला विरोध केला. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यांनतर न्यायालयाने अ‍ॅड सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कर्मचार्यांना जामीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here