गुजरात मध्ये खळबळ! मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा !गुजरात मध्ये खळबळ! मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा !
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
रुपानी यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (CM Vijay Rupani Resignsआपल्याला संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढे पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेगदरम्यान विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याने गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची सुत्रे कोणाच्या हातात देण्यात येणार, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
पक्षासाठी काम करणार – विजय रुपाणी मात्र, भाजपात वेळेनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली असून यापुढे पक्षासाठी काम करणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले.आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभारविजय रुपाणी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांना आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले.राज्यपालांची भेट घेण्यासाठी विजय रुपाणी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल देखील उपस्थित होते. गुजरातमध्ये डिसेंबर २०२२ साली विधानसभा निवडणूक नियोजित आहे.विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारीत्याआधीच विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात भाजपामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष देखील गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.कोण होणार पुढील मुख्यमंत्री ? रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होतातेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.