गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद

    15

    अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. २०१८ पासून फरार असलेल्या डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबीरे ( रा. कोथिंबिरे वस्ती, साळवन देवी रोड, ता. श्रीगोंदा) याला शनिवारी पुण्यातील मांजरी बुद्रूक येथून अटक करण्यात आली आहे.

    कोतवाली पोलीस ठाण्यात् १७ जुलई २०१८ रोजी संगिता सोमनाथ तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरुन डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबीरे (रा. कोथिंबिरे वस्ती, साळवन देवी रोड, ता. श्रीगोंदा), भगवतीबाई रतनसिंग सिसोदिया (रा. मक्सी, जि. शहाजापूर, राज्य मध्य प्रदेश), संतोष जवाहरसिंग पवार, रा. आर.डी. कॉलनी मक्सी, जि. शहाजापूर, मध्य प्रदेश) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तपासादरम्यान, आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिल्यनगर येथील माळीवाडा परिसरात रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीची स्थापन करून गुंतवणूकदारांना जास्त परतावा व बक्षिसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषातून एकोणचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये रक्कम विश्वासाने घेतली, परंतु गुंतवणूकदारांना परत दिली नाही. तसेच कार्यालय कायमचे बंद केल्याचे उघड झाले.

    सदर गुन्ह्याचा तपास अहिल्यनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता. पथकाला गुप्त माहितीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणामधून आरोपी डॉ. संतोष कोथिंबीरे पुण्यातील मार्जरी बुद्रूक परिसरातील साई श्रध्दापार्क, गोपाळपटटी परिसरता वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून रचून आरोपीला आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस प्रशासनाने ठेवीदारांना रिलायबल लँड्समध्ये ठेव स्वरूपात रक्कम ठेवली असेल आणि ती परत मिळाली नसेल, तर संबंधित कागदपत्रे आणि पुरावे घेऊन आर्थिक स्थानिक गुन्हे शाखेला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पो.उप. अधिक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिशीरकुमार देशमुख, सपोनि योगेश जाधव, पो. उप निरीक्षक योगेश पवार, पोहेकॉ कावरे, पोहेकॉ खोमणे आणि दक्षिण मोबाईल सेलचे पोहेकॉ राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here