
गाझियाबाद, उत्तर प्रदेश: मुरादनगरच्या अग्रसेन विहार फेज वन कॉलनीमध्ये बुधवारी गिझरमधून गॅस गळतीमुळे गुदमरल्यानं एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
होळी साजरी केल्यानंतर, दीपक (40) आणि शिल्पी (36) आंघोळीसाठी गेले आणि त्यांनी त्यांचे गॅस गिझर चालू केले परंतु गळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे एक तासानंतर त्यांच्या मुलांना ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले, असे त्यांनी सांगितले.
या जोडप्याला गाझियाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.