गिर्यारोहक अंबादास गायकवाड यांच्या कामगिरीची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद..

439

एमआयडीसी औरंगाबाद कार्यालयातील कर्मचारी अंबादास गौतम गायकवाड यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुस १८५१० फूट येथे आपल्या देशाचा ७५ व्यां स्वतंत्र दिवस व अमृत महोत्सव वर्ष व भारतीय ध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन, साजरा केला होता.

युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुस वर स्वतंत्र दिवस साजरा करणारे पहिले भारतीय ठरलेले असल्यामुळे सदरची नोंद High Range book of world record व India record येथे घेण्यात आली.

मागील आठवड्यात गायकवाड यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानिमित्ताने म. औ. वि. म चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. पी.अनबलगन, आयएएस यांनी दिनांक १९/०१/२०२२ रोजी एमआयडीसी चे मुख्य कार्यालय उद्योग सारथी येथे, नोंद झालेले वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व महामंडळाचे लोगो असलेले ब्लेझर अंबादास गायकवाड यांना देऊन सन्मानित केले व पुढील मोहिमेस व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड मुळे महामंडळाची प्रतिमा उंचावण्याचे काम गायकवाड यांनी केले असून महामंडळाचे नाव आणखीन एकदा जागतिक स्तरावर नावलौकिक केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here