गावसकरांचा सल्ला_न्युझीलंडविरुद्ध जिंकायचे असेल, तर यांना बाहेर करा..!

    गावसकरांचा सल्ला*_*’न्युझीलंडविरुद्ध जिंकायचे असेल, तर यांना बाहेर करा..! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला. त्यामुळे ‘टीम इंडिया’ची वाटचाल कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) भारताचा सामना न्युझीलंडसोबत होणार आहे. पाकिस्तान संघाने न्युझीलंड संघाचाही पराभव केल्याने त्यांच्यासाठीही हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळेही तेही जिवाची बाजी लावून खेळणार, हे नक्की. विशेष म्हणजे, आपण टी-20 वर्ल्ड कपमध्ये कधीही न्युझीलंडविरोधात जिंकलेलो नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी माजी कप्तान सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, की “न्युझीलंडला हरविण्यासाठी ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये दोन बदल करावे लागणार आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूर, तसेच इशान किशनचा संघात समावेश करावा.” *इशान जबरदस्त फॉर्ममध्ये*ते म्हणाले, की “खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करीत नसल्यास मॅच फिनशर म्हणून इशान किशनला संघात घ्यावे. सध्या इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून, सराव सामन्यात तो चमकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी द्यायला हवी.” भुवनेश्वर कुमार सध्या फॉर्मात दिसत नाही. अशा परिस्थितीत शार्दुलचा टीम इंडियात समावेश करणे आवश्यक आहे. ‘आयपीएल’मध्ये त्याने 21 विकेट घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुध्द 11 धावा करु शकला. त्यामुळे त्याच्या जागी इशानचा समावेश करावा, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here