औरंगाबाद : वरुड काजी-गंगापूर रोडवर गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलास चिकलठाणा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलीस स्टेशन चिकलठाणा , औरंगाबाद ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी गोपनीय माहिती मिळाली कि , वरुड काजी ते गंगापुर जहागीर रोडने एक व्यक्ती निळ्या रंगाचे मोटार सायकवर बसुन गावठी कट्टा पिस्टल घेवुन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी पंचासक्षम गंगापुर जहागीर शिवारात सारा स्वपनांगन सोसायटी जवळ सदर व्यक्तीस अडवले. व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुस व दोन मोबाईल आढळून आले. पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या ताब्यातील दुचाकीही जप्त केली आहे.
सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे , उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश आंधळे , पोउपनि गणेश राऊत , पोलीस हवालदार / अजित शेकडे , गणेश मुळे , पोना / रविंद्र साळवे , पोना / सोपान डकले , पोकॉ / दिपक सुरोशे , पोकॉ / आण्णा गावंडे , पोना / देविदास सास्ते , दिपक देशमुख यांनी केली आहे .