बीड ( दि,२४ प्रतिनिधी):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने बीडमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होऊन गाढवाच्या गळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो अडकवत धिंड काढली आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बीड शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.
एका गाढवाच्या गळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लटकवत त्यावर नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळाही लावण्यात आला आणि त्याला चपलांची माळ घालण्यात आली.
या गाढवाची धिंड शहराच्या मुख्य रस्त्यांवर काढण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. बीड प्रतिनिधी- नवनाथ आडे