
वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून सिग्नल मोडला, चुकीच्या दिशेने वाहन चालविले की, सीटबेल्ट लावला नाही तर अशा अनेक गोष्टींसाठी वाहतूक खाते दंड आकारते. सध्या सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पावत्या घरी पाठविल्या जातात. अनेकदा मोबाईलवर मेसेज करून माहिती दिली जाते. परंतू, लोक एवढे निर्ढावलेले असतात. पावत्यांवर पावत्या फाटत चालल्या तरी दंड काही भरत नाहीत. यात मोठमोठे राजकीय नेत्यांची देखील भरमार असते. परंतू, आता पोलिसांनी एक शक्कल लढविली आहे. वाहतूक खात्याने पाच पावत्यांचे लिमिट ठरविले आहे. महिनोंमहिने जे लोक दंडाच्या पावत्या भरत नाहीत त्यांच्यासाठी आता कारवाई सुरु झाली आहे. पाच पेक्षा जास्त पावत्या पेंडिंग राहिल्या की त्याचे वाहन आपोआप नो ट्रान्झेक्शन मोडमध्ये टाकले जाणार आहे. म्हणजे हा व्यक्ती जेव्हा त्याचे वाहन विकायला जाईल किंवा लोन किंवा अन्य काही कामे करण्यासाठी जाईल तेव्हा त्याला तो दंड ऑनलाईन भरता येणार नाहीय.