गांधी जिल्हा आपल्या कार्याने महाराष्ट्राला दिशा दाखवेल -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

787

गांधी जिल्हा आपल्या कार्याने महाराष्ट्राला दिशा दाखवेल
-पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

    भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

घटनेपासून दूर गेल्यास देश विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही
शहिदांच्या वारसांना जमिनीचे पट्टे वाटप
कोरोना कार्यात उत्कृष्ट कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

वर्धा, दि 15 ऑगस्ट( जिमाका) :- सामान्यांच्या भूमिकेतून एकत्र येऊन चर्चा करून जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. राजकारण आणि समाजकारणाचा एकमेव बिंदू हा सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे हा आहे. सामान्य माणसाला त्याच्या दुःखाची नोंद शासन दरबारी घेतली जातेय आणि त्यावर निर्णय घेतले जातात याचा विश्वास देण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गांधी जिल्हा अत्यंत प्रेमाने आणि समृद्धीने पुढे नेण्यासोबतच महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वातून दिशा दाखवेल असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.


संबोधित करताना श्री केदार म्हणाले, पहिल्या लाटेत उत्तम काम वर्धा जिल्ह्याने करून दाखवलं त्याची नोंद राज्यासह देशाने घेतली. दुसया लाटेतही सर्वत्र हाहाकार असताना जिल्हा प्रशासन, पत्रकार, स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक यांनी अत्यंत चांगली भूमिका वठवून जिल्ह्यातील गोर गरीबाच्या उपयोगी योजना राबवून उत्तम कर्तव्य निभावले याची नोंद सुद्धा राज्य शासनाने घेतलेली आहे. हे करत असताना केवळ वर्धा जिल्ह्यापुरती आरोग्य सेवा मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांनाही कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरविण्याची भूमिका वर्धा जिल्ह्याने वठवलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन मोठ्या रुग्णालयातील रुग्णांची यादी आपण तपासली तर याची कल्पना येईल. वर्धा जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर अपेक्षित असलेले काम केले आहे. महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या या जिल्ह्यात मानव सेवेची भावना आणि कृती अशीच घडत राहील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोनाच्या काळातही विकासाच्या कामाला गती दिलीच आहे. धाम धरणाच्या सांडव्याची उंची वाढवून एकेकाळी वर्धा शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई यापुढे निर्माण होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांना गती दिलेली आहे. शिवाय यामुळे 2 हजार हेक्टर शेतीला सिंचनासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.
देशाचा स्वातंत्र्याचा गाडा झपाट्याने विकासाकडे नेत असताना देशाची स्वातंत्र्यता , सर्व सामान्य माणसाचे हक्क शाबूत ठेवायचे असतील तर घटनेपासून दूर जाता कामा नये. देशाच्या घटनेपासून दूर गेल्यास देश विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
माध्यमांनी चांगले काम करत असताना आम्हाला शाबासकी द्यावी, चुकत असल्यास आमच्या लक्षात आणून द्यावे, पण पत्रकारांनी दुरावा ठेऊ नये. माध्यमांनी दुरावा ठेवल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणीची, खऱ्या वस्तुस्थितीची माहिती होणार नाही. त्यामुळे योग्य दिशेने पावले टाकता येणार नाही, म्हणून माध्यमांची महत्वाची भूमिका लोकशाहीमध्ये आहेच ती आम्ही मान्य करतो असेही पालकमंत्री यावेळी संबोधित करताना म्हणाले.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या मानवंदनेचा पालकमंत्री यांनी स्विकार केला. यावेळी शहिद जवानांच्या वारसांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. तसेच शहिद जवानांच्या विरताता यांचा शाल व श्रीमळ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस महासंचालकाचे अप्पर पोलीस अक्षीक यशवंत सोळके , पोलीस निरिक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक महेद्र इंगळे यांनी मंत्रीमहोदयाच्या हस्ते सनन्मान पदक देवून गौरव करण्यात आला.
पालकमंत्र्याचे हस्ते कोराना काळा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल तसेच इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद प्रशासन ,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन ,नगरविकास प्रशासन,अधिष्ठाता, सेवाग्राम रुग्णालय,अधिष्ठाता, आार्चाय विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी. या सर्व विभागांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हयातील उपविभागी अधिकारी सुरेश बगळे, तहसीदार रमेश कोडापे, नायब तहसिलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी माधव राठोड, तलाठी मौजा राजनवाडी एन.जे.भेंडे, अव्वल कारकुन कारजा येथील एस.बी निकम, तसेच महाव्यवस्थाप जिल्हा उद्योग केंद्र मे.जे.के. ॲग्रो प्रॉडक्टंस मौजा दहेगांवचे वेदांत गोयल , श्रीकृष्ण इंडस्टीज लखमापुरचे नरेश करतारी , महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रथम पुरस्कार आर्चाय विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी , कस्तुबा रुगणालय सेवाग्राम यांना दुत्तीय , सामान्य रुग्णालय वर्धा यांना तृतिय पुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वामित्व योजनेजी प्रभावी अमलबंजावणी केल्याबद्दल जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख संजय मडके,वन हक्क कायदयाअंतर्गत पारंपारीक व निवासी व्यक्तीना वन हक्कांचे पट्टे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील भारत स्काऊट आणि गाईडची सुवर्णबाण परीक्षा यशस्वीपणे उर्त्तीण केलेल्या वैदिका प्रकाश काळे व सृष्टी सुशिल कार्लेकर यांचा प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here