गर्दी होत असेल तर धार्मिक स्थळ आणि दारुच्या दुकानांवर सुध्दा निर्बंध लावणार..

617

आरोग्यमंत्र्यांचा इशारा.. राज्यात कोरोना व ओमायक्रोंनच्या वाढत्या धोक्यामुळे आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात आता दारुची दुकानही बंद करावी लागणार, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलतांना दिला. ▪️राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ऑक्सीजनची मागणी थोडी वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही, असंही त्यांनी सांगितलं. ▪️जारी केलेल्या निर्बंधानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना दिसत आहेत. यामुळे गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील, त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here