गटविकास अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक..

.हिंगोली: हिंगोलीत लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. औंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना अटक केली आहे. सध्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून गुरांचा गोठा व सिंचन विहिरी मंजूर करून अनुदान वाटप करणे सुरू आहे, याच योजनेचा लाभ देण्यासाठी गटविकास अधिकारी खिलारी यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.शासकीय योजनेतील जनावरांच्या गोठ्याचे व विहिरीचे कार्यारंभ आदेश देणार नसल्याचे देखील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले होते त्यामुळे, तक्रारदाराने याबाबतची तक्रार हिंगोलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत गटविकास अधिकारी हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज त्यांच्या कार्यालयातच सापळा रचून त्यांना रंगेहात अटक केली आहे. दरम्यान उच्चश्रेणीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्याने हिंगोली जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here