गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

    गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

    गंगापूर औरंगाबाद :  गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक यांनी दहा हजार रुपयांची मागणी केल्यामुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस नाईक हरिचंद्र अशोक नरके,( वय 40) यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रु लाचेची मागणी केल्याचे उघडकीस झाल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद (Bribery Prevention Department, Aurangabad) च्या वतीने कारवाई करण्यात आली असून गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) यांनी तक्रारदार यांना दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी व पो.स्टे ला जमा केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी  10,000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली. या तक्रारींचे अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता, हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) , यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाणे गंगापूर येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक .डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पांडत (Superintendent of Police. Rahul Khade, Upper Superintendent of Police Vishal Khambe, Deputy Superintendent of Police Maruti Pandat) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी (Police Inspector Shubhangi Suryavanshi) यांनी केली आहे.या कारवाईत त्यांना  पो.ना. राजेंद्र सिनकर, पो अं. विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे, चालक पा.अ. चांगदेव बागुल (Po.Na. Rajendra Sinkar, Po no. Vilas Chavan, Kevalsingh Ghusinge, Driver P.A. Changdev Bagul) यांनी मदत केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here