अहमदनगर -खोटे दस्तऐवज तयार करून मोटार अपघाताचा दावा कोपरगाव न्यायालयात दाखल केल्याप्रकरणी नगर येथील अॅड. मंगला राजेश कोठारी (श्रीरंग अपार्टमेंट, गुजरगल्ली) व नंदकुमार छोटुलाल खिच्ची (सावळीविहिर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एमएसीपी ३६९/२००२ या दाव्यात समाविष्ट फिर्याद, घटनास्थळ, पंचनामा आदी दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून दावा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी अॅड. मंगला राजेश कोठारी यांच्यासह नंदकुमार छोटुलाल खिच्ची या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.