खोटे बिल देऊन नांदेड व अहमदनगर पोलिस अधीक्षकांना फसवले. धुळ्याच्या कन्हैय्या शुटींग फर्म ने बिलावर बनावट जी.एस. टी. नंबर टाकून करोडोचा महसूल बुडवला

खोटे बिल देऊन नांदेड व अहमदनगर पोलिस अधीक्षकांना फसवले.
धुळ्याच्या कन्हैय्या शुटींग फर्म ने बिलावर बनावट जी.एस. टी. नंबर टाकून करोडोचा महसूल बुडवला

नांदेड – धुळे येथील कन्हैया शूटिंग फर्म कडून पोलीस अधीक्षक नांदेड व अहमदनगर यांनी पोलिसांसाठी ड्रेस कापड व शूज खरेदी केले होते .तर त्यांना फर्म ने दिलेल्या बीलावर जी.एस. टी.नंबर बनावट व शॉप ॲक्ट चा नंबर नसलेले बिल देऊन या शासकीय कार्यालयासह शेकडो ग्राहकांना फसऊन करोडोचा जीएसटी चुकावला .ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी माहिती अधिकारात माहिती घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
महाराष्ट्र शासन व पोलिस महासंचालक यांचे मार्फत राज्यातील पोलिसांना दरवर्षी ड्रेसचे कापड साठी प्रत्येकी ५१६७ रुपये देत असतात. पोलीस अधीक्षक यांना पोलीस शिपायाच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे आदेश होते . त्या प्रमाणे राज्यातील पोलिस अधीक्षकांनी सन २०१८ या आर्धिक वर्षात आलेले पैसे पोलिस शिपायाच्या खात्यात रक्कम जमा केली.पण २०१८ला तत्कालीन पोलीस अधीक्षक नांदेड संजय जाधव व पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनी मात्र ही रक्कम सरळ पोलीस शिपायाच्या खात्यात जमा न करता धुळे येथील श्री कन्हैया शूटिंग या फर्मच्या मालकाशी संपर्क करून त्याच्याकडून ड्रेस कापड व शुज खरेदी केले. तत्कालीन नांदेड पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ९४ लाख ४७हजार २५०रुपयाचा तर अहमदनगर पोलिस अधीक्षकांनी ८९ लाख १० हजार रुपयाचा ड्रेस चा कपडा व शुज या फर्म कडून खरेदी केला. नांदेड पोलीस अधीक्षक यांना फर्म ने बिल दिले त्या बिलाचा नंबर १०८ आहे. अहमदनगर पोलिस अधीक्षकांनी तर बिल न घेताच सदर रक्कम फर्म ला अदा केली.
पोलिस शिपायास दिलेले हे कापड व शुज निकृष्ट दर्जाचे असल्याचे पोलीस शिपाई यांच्यात चर्चा झाल्यावर ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी माहिती अधिकारात या व्यवहाराची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात केली व माहिती घेताना या गैर व्यवहाराचे, कामाचे एक एक प्रकरण समोर येत होते .कोटीच्या जवळपास खरेदी व्यवहार असताना पोलीस अधीक्षकांनी टेंडर अथवा ई टेंडर बोलावले नाही .पैसे शिपायाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असताना ड्रेस कापड खरेदी करण्याचा स्वतः निर्णय नांदेड व अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी घेतला. हे शूटिंग चे दुकान असताना यांचेकडून शुज कसे घेतले हाही प्रश्न आहे .हा माल घेतला त्यांचे बिलावर शॉप अॅक्ट लायसन्स नंबर नाही, जीएसटी नंबर चुकीचा बनावाटआहे .तरी पोलिस अधीक्षकांनी कोटीच्या जवळपास रक्कम सदरील फर्मला आदा केली. तर अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी बिल् न घेताच ८९ लाख रुपये सदरील फर्मला अदा केले. श्री कन्हैय्या शूटिंगचा व पोलिस अधीक्षकांचा हा सर्व गैरप्रकार माहिती अधिकारात समजल्यावर ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी सदरील फर्म विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास वजिराबाद पोलिस स्टेशन ला दि. २१-८-२०१९ ला तक्रार दिली. नंतर पोलीस अधीक्षक नांदेड यांना दि.३-११-२०२० ला तक्रार दिली .तरी अध्याप यांचेकडून कोणतीच चौकशी झाली नसल्यामुळे तक्रारदार यांनी राज्यकर आयुक्त धुळे व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेकडे माल खरेदी व्यवहार व सदरील फर्म च्या व्यवहाराची चौकशी करून यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रारी निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here