खेर्डे यात्रेतील खूनप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी; आम आदमी पक्षाची मागणी

    606

    खेर्डे यात्रेतील खूनप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी; आम आदमी पक्षाची मागणी

    पाथर्डी:-खेर्डे गावातील यात्रेमध्ये एका युवकाचा खून झालेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी केली आहे.याबाबत आव्हाड यांनी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील खेर्डे गावातील राजेंद्र जेधे वय ३० या युवकाची हत्या पूर्वीच्या वादातून करण्यात आल्याची फिर्याद मयताच्या चुलत्याने पाथर्डी पोलिसात दिली.

    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खर्डे गावामध्ये दि ३ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री सालाबाद प्रमाणे ग्रामदैवताची खुप मोठी यात्रा भरवण्यात आली होती. यात्रा कीमिटीने डीजे , नाचण्यासाठी बाहेरून महिला ,दारूगोळा, फटाके अतिषबाजी करत यात्र भरावली होती.त्याचवेळी गावातील तरुण देखील यात्रेमध्ये नाचत होते.त्यादरम्यान गावातील एका तरुणाने मागील वादाच्या रागातून एका गावातील च युवकाचा चाकुन पोटात वार करून खून केला याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन चार आरोपी अटक देखील केले आहेत .

    एकीकडे कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांनी यात्रा किंवा उत्सव भरविण्यासाठी बंदी घातली आहे.आदेश देखील पारित असताना यात्रेवर निर्बंध असून खेर्डे गावामध्ये यात्रा का भरवण्यात आली?त्यासाठी यात्रा कमिटीने प्रशासनाची परवानगी का घेतली नाही? बंदी असताना डीजे नाचण्यासाठी बाहेरून महिला आणणे हे सर्व प्रकार गंभीर आहेत.हि यात्रा भरली नसती तर कदाचित ही घटना घडलीच नसती त्यामुळे गावामध्ये यात्रा साजरी करण्यासाठीजी यात्रा कमिटी नेमली होती त्या कमिटीचा शोध घेऊन त्यांना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात यावे. अथवा यांचेवर वेगळा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.डी जे व नाचकाम करणाऱ्या महिला यांचा देखील शोध घेण्यात यावा व अशा प्रकारे जबाबदार असलेल्या यात्रा कमिटीवर कडक कारवाई करण्याची मागणी किसन आव्हाड यांनी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी ,प्रांताधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी यांना सुद्धा निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत.
    ?आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांचे यासंदर्भात निवेदन प्राप्त झाले आहे.त्याअनुषंगाने चौकशी करून योग्य ती सर्व प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल.

    • सुहास चव्हाण (पोलीस निरीक्षक ,पाथर्डी पोलीस स्टेशन )

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here