खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध ! मंत्री म्हणतात.4000 टन कोळसा गायब झाला आहे.

    131

    मेघालयमधून मोठा कोळसा घोटाळा समोर येत आहे. थोडा थोडका नव्हे तर 4000 टन कोळसा गायब झाला आहे. यावरून हायकोर्टाने फटकारताच राज्याच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात जसे खेकड्यांनी धरण पोखरल्याचे कारण सांगितले गेले, तसे हास्यास्पद कारण दिले आहे. हजारो टन कोळसा म्हणजे पावसाच्या पाण्यात वाहून गेला असेल असे मेघालयच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.

    सोमवारी माध्यमांशी बोलताना उत्पादन शुल्क मंत्री किरमेन शिल्ला यांनी हायकोर्टाच्या निर्देशांवर हे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असतानाच या कोळशाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here