खूनप्रकरणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ भांडण याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन झालेल्या जोरदार भांडणाचे पर्यावसान खुनात झाले होते.
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या तरुणाच्या या खूनप्रकरणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गोविंद साळपाटील खेमनर, विशाल ऊर्फ छोटू हौशीराम खेमनर आणि संपत ऊर्फ प्रशांत शांताराम गागरे अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत.