पुणे : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोना संसर्गाची लागण झली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली त्यानंतर त्यांनी आपली कोविड टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार चार दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उदयनराजे भोसले यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासदार उदयनराजे हे चार दिवसांपूर्वी दिल्लीहून थेट रुग्णालयात दाखल झाले. दिल्लीहून आल्यावर उदयनराजे भोसले यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.





