खारकिव्हमधील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू, दोन दिवसाआधीच केला होता घरच्यांना फोन |युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन शेखराप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील चळगेरी गावातील रहिवासी आहे.
खारकिव येथे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडला होता. यावेळी भाजीपाला घेत असताना रशिया आणि युक्रेनच्या सैन्यानं बॉम्बहल्ला केला. आणि यातच नवीनचा मृत्यू झाला.
नवीन शेखरप्पा हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत होता.