वाशिम,दि.10:2 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शासकीय अधिकारी,कर्मचारी, खाजगी आस्थापनेतील कर्मचारी,व्यावसायीक,फेरीवाले,रिक्षा,टॅक्सी चालक व इतर कामगार कर्मचारी यांचे तात्काळ लसीकरण पुर्ण करुन घेण्याबाबत निर्देश दिले आहे.
जिल्हयात कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. याअनुषंगाने कोवीड-19 लसीकरण मोठया प्रमाणात राबविण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पहीला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 60.53 टक्के आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 33.19 टक्के आहे. कोवीड-19 रुग्णसंख्येचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने लसीकरण महत्वाचा उपाय आहे. संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात असलेले लसीकरण हा चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यामध्ये कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस यांनी केले आहे.
कोविड-19 लसीकरण वाढविण्यासाठी नगरपालीका, नगरपंचायत तसेच ग्रामिण स्तरावर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर घरोघरी येऊन लसीकरणाबाबत माहिती घेणार आहेत. याबाबत नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे.तसेच आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे. कोवीड-19 संभाव्य तिस-या लाटेचा धोका टाळण्यासाठी तसेच स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी व इतरांपासून आपल्या कुटुंबाला कोविड-19 पासून वाचविण्यासाठी लसीकरण करुन घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.