क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवल्याने यापुढे मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार – खा. इम्तियाज जलील
औरंगाबाद : राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता. असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, अशी माहिती इमतियाज जलील यांनी दिली आहे.
शहरातील सुभेदारी हाऊस येथे इम्तियाज जलील यांच्या वतीने आज रविवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याच्या निषेधार्थ येत्या 15 ऑगस्टला एमआयएम पक्षाच्या वतीने सर्व राज्याच्या नेत्यांना व मंत्र्यांना घेराव घालून व काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत. क्रीडा विद्यापीठ वापास आणण्यासाठी आंदोलन असेच पुढे चालू ठेवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.




