क्रिप्टो मार्केट क्रॅश! आठवडाभरात बिटकॉईनच्या किंमतीत तब्बल 40 टक्क्यांची घसरण!
जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीं बिटकॉईन आणि दुसर्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीं इथेरियम यासह क्रिप्टोकरन्सी मार्केट पुन्हा एकदा क्रॅश झाले.
? जानेवारीनंतर बिटकॉईन पहिल्यांदाच 30,000 डॉलरच्या खाली आला. गेल्या 24 तासांत बिटकॉईनची किंमत 9% पेक्षा जास्त घसरली आहे. काल संध्याकाळी 6 वाजता, बिटकॉइन 9.18% च्या घसरणीसह 29,571 डॉलर म्हणजेच 22 लाख रुपयांच्या खाली ट्रेड करत होता.
? जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल करन्सीं असलेल्या इथेरियमच्या किंमतीही गेल्या 24 तासांत 8% पेक्षा जास्त खाली आल्या आहेत. इतर क्रिप्टोकरन्सीसमध्येही अशीच परिस्थिती आहे.
? आठवडाभरात बिटकॉईनच्या किमतीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची घसरण झाली आहे; पण काल सर्वात मोठी घसरण Dogecoin मध्ये झाली. 25% पेक्षा अधिक त्याची किंमत 0.17 डॉलरच्या खाली आली.
टॉपच्या क्रिप्टोकरन्सीचे दर – 22/06/2021 रोजी, संध्याकाळी 6 वाजता
▪️ इथेरियम 8.55% ने कमी करून 1802.12 डॉलरवर Tether ची किंमत 1 डॉलरने वाढली.
▪️ Binance Coin 21.24% खाली 240.24 डॉलरवर होता.
▪️ Cardano 19% च्या खाली 1.04 डॉलरवर होता.
▪️ Dogecoin 25% खाली येऊन 0.17 डॉलरवर होता.
▪️ XRP 20% खाली $ 0.53 डॉलरवर ट्रेड करत आहे.
▪️Polkadot आज 21.71% खाली घसरून 13.48 डॉलरवर ट्रेंड करत आहे.
▪️ Bitcoin Cash आज 16.28% खाली घसरून 402.27 डॉलरवर ट्रेड करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





