
ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आला असून ही घोषणा मुंबईत पार पडलेल्या IOC च्या 141 व्या अधिवेशनात झाली. 2028 च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकपासून क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. आता याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
आयसीसी क्रमवारीतील टॉपच्या सहा संघांना सहभागी होता येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेटचे सामने होईल. ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन वर्गात क्रिकेटचे सामने खेळवले जाईल. प्रत्येक संघात 15 खेळाडूंचा समावेश असणार आहे. 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा क्रिकेट खेळले जाणार आहे.
FEB24 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी नियम बनवले आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 90 खेळाडूंना तयार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 संघ सहभागी होऊ शकतील, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या संघात 15 खेळाडू ठेवले जातील.
पात्रता प्रक्रियेबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही, परंतु यजमान म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) ला थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेला 2028 च्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला तर पात्रतेसाठी फक्त 5 जागा रिक्त राहतील.
जर संघ रँकिंगच्या आधारे पात्र ठरले तर सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे पुरुषांच्या टी-20 मध्ये जगातील टॉप-5 संघ आहेत. तर महिला टी-20 संघांच्या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या पाच स्थानांवर आहेत.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना गेल्या अनेक दशकांपासून क्रिकेट जगतात उत्साह निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत, भारत-पाकिस्तान सामना ऑलिम्पिकमध्ये खेळला जाईल का, असा प्रश्न लोकांच्या मनात नक्कीच निर्माण होईल.