कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवरील चाचणी यशस्वी:

कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवरील चाचणी यशस्वी

कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवरील चाचणी दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात यशस्वी झाली आहे. ▪️२ ते १८ वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात आली होती. लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत असतानाच एम्समधून ही महत्वाची माहिती समोर आली आहे.▪️कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि प्रौढांचे लसीकरण सुरू आहे. ▪️आतापर्यंत ७० कोटी नागरिकांनी लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापुढे लहान मुलांच्या लसीकरणाचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. ▪️केंद्रीय औषध नियंत्रकांच्या परवानगीनंतर ७ जूनपासून कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here