कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…

    857

    कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…

    पुणे :- पुण्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असतानाच प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला आहे. अशातच जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या 33 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे.

    या महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आईने गुरूवारपासून कोव्हिड सेंटर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. प्रिया गायकवाड असे या महिलेचे नाव आहे.यांच्यासोबत काय घडले? त्या कुठे गायब झाल्या? याची कुठलीही माहिती कोणाकडेही नाही. सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासही जंबो कोव्हिड सेंटरकडून नकार देण्यात येत असल्याचे प्रिया गायकवाड यांच्या आई सांगतात.

    दि.29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ससून हॉस्पिटल मार्फत शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या महिलेविषयी उलट-सुलट माहिती देऊन खरी माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी तसेच अद्याप पर्यंत सदर महिला आढळून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मुलगी अॅडमिट आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे वेळोवेळी सांगून डिस्चार्जच्या वेळेला मात्र मुलगी आमच्याकडे ॲडमिट नाही असे सांगून फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

    याबाबत मुलगी अॅडमिट आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत असे वेळोवेळी सांगून डिस्चार्जच्या वेळेला मात्र मुलगी आमच्याकडे ॲडमिट नाही असे सांगून फसवणूक करणे प्रकरणी जम्बो कोव्हिड केअर प्रशासनाच्या निषेधार्थ सदर आंदोलन करण्यात येत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here