कोविड सेंटर्ससाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

1098

कोविड सेंटर्ससाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई , (दि.29 सप्टेंबर) : राज्यात कोविड सेंटर्समध्ये लैंगिकअत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाने रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचना कोवीड केअर सेंटर्स, कोविड हेल्थ केअर सेंटर्स, डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, जम्बो कोविड सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्स मध्ये अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास पीडित व्यक्तीची तपासणी त्या सेंटरमध्येच करावी. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ (स्त्री वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी) जवळच्या शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयातून उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारा तपासणी कक्ष कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात यावा. कोविड प्रोटोकॉलनुसार पीपीई कीट वापरून पीडिताची वैद्यकीय तपासणी करावी. पीडित व्यक्तीला कोवीड सेंटरमध्येच कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, पोलिस मदत उपलब्ध करून द्यावी. या मार्गदर्शक सूचनांची राज्यभर अंमलबजाणी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here