कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज अहमदनगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन साहेबांची भेट व तेथील परिस्थितीचा आढावा खासदार डॉ सुजय विखेपाटील यांनी घेतला.
त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस मध्ये माननीय कलेक्टर श्री. राजेंद्र भोसले, एसपी श्री. मनोज पाटील व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्तिक बैठकीत सहभाग घेऊन रेमडिसिव्हीर व ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात चर्चा केली.
तसेच लवकरात लवकर रेमडिसिव्हीर उपलब्ध करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.तसेच पेशंटला होणाऱ्या गैरसोयी, होणारी लूट या सर्व विषयांबाबतीत चर्चा करून ह्यावर तोडगा काढण्याची सूचना केली.
कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्ज आहे तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.