कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात बंदयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ सुदृढ होण्याच्या हेतुने “तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये या कारागृहातील अंदाजे 2 हजार बंदयांनी सहभाग घेवून उदंड प्रतिसाद दिला.
“तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मार्फत आयोजित परिवर्तन “प्रिझम टू प्राईड” या उपक्रमाअंतर्गत या कारागृहातील बंदयांनी हॉलीबॉल, कॅरम, चेस या खेळामध्ये सहभाग घेवून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडुंना बक्षिस देवून गौरवण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा मार्गदर्शक भरत चौगले (चेस), प्रथमेश शिंदे (हॉलीबॉल), गौरव हुदके (कॅरम), कारागृहाचे अधीक्षक सी.ए.इंदुलकर, वरिष्ठ जेलर, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
000000
Home महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात “तिमीरातुन तेजाकडे” बंदी कलारजनी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न