*कोरोना संसर्गामुळे तांदळी वडगाव धर्मनाथ यात्रा उत्सव रद्द**
मोजक्या भावीक भक्तां मध्ये पारंपारिक पद्धतीने धर्मनाथ उत्सव पार पडला.
नगर प्रतिनिधी : नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील धर्मनाथ देवस्थान आहे. या देवस्थानाला खुप पुरातन इतिहास आहे.हे देवस्थान मुक्या जनावरांना पावणारा देवस्थान आहे, हि भावना या भागातील नागरिकां मध्ये आहे.रितिरिवाजा प्रमाणे मोजक्या भावीक भक्तांच्या उपस्थित धर्मनाथ देवस्थान या सप्ताहा उभारला होता. या यात्रेची खास खासियत म्हणजे यात्रेचा वार शनिवार आहे . सप्ताहाच्या शेवटी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. मात्र या वर्षी कोरोना संकट लक्षात घेता यात्रा उत्सव मोजक्या भावीक भक्तां मध्ये पार पडला.या देवस्थानाला आसपासचा गावातील भाविक भक्त आपल्या घरची पाळीव जनवारे धर्मनाथ दर्शना साठी घेऊ येत असतात, या देवस्थानाला बैल ,गाय, असे पाळीव जनावरांना या देवस्थानाला प्रदिक्षणा घालुन होमातील अंगारा लावला जातो. या ठिकाणी प्रसाद स्वरुपात कन्या आमटी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. प्रत्त्येक भावीक प्रसाद घेऊन आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ होतात. या वर्षी करोना संकटं आजुन टळलेले नसल्याने (दि २८) वार शनिवार रोजी तांदळी वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे हे प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.तरी नगर तालुक्यातील व जिल्ह्यातील भावी भक्तांनी यांची दखल घ्यावी. असे आव्हान करण्यात आले होते.या प्रसिद्ध पत्रकावर संरपच बाळासाहेब ठोंबरे, ग्रामसेवक पिंपळे यांची स्वाक्षरी आहे. यांची एक प्रत नगर तालुका पोलिस प्रशासनाला दिली आहे.






