अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही नऊ लाख नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच पहिला डोस घेऊन मुदत संपूनही पाच लाख नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.अशा लोकांवर आता औरंगाबाद प्रमाणे कडक नियम लावा असे आदेश पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना आज दिले.पेट्रोल, रेशन आदी ठिकाणी लसीकरण नसणाऱ्या लोकांना सेवा देऊ नका. अशा लोकांची यादी त्या-त्या गावात लावा, त्यांना शोधून लसीकरण पूर्ण करा असे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.नोव्हेंबरला महिन्यात ऐन दिवाळीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना रूग्ण उपचार घेत असलेल्या आयसीयू विभागाला आग लागली होती, त्यात जागेवर अकरा तर नंतर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.या आग लागल्या प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या मार्फत दहा तज्ञ समितीने आगीच्या कारणावर माहिती घेत शासनाला अहवाल सादर केला आहेझ हा अहवाल आरोग्यमंत्र्यांना पण पाठवण्यात आला असला तरी नेमके या अहवालात समितीने काय निष्कर्ष काढले हे आणि याबाबत कुणावर कारवाई होणार का हे अजून गुलदस्त्यात आहे.याबाबत पालकमंत्र्यांना छेडले अस्तझ मी आरोग्यमंत्र्यांना भेटून अहवाल सार्वजनिक करण्यास सांगेन असे सांगितले. आपण अजून हा अहवाल पाहिलेला नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.एवढ्या मोठ्या घटनेला दीड महिना उलटलेले असताना आणि पंधरा दिवस होऊन अहवाल तयार असताना त्याबाबत काहीच स्पष्टीकरण नसल्याने तसेच खुद्द पालकमंत्र्यांनीच हा अहवाल पाहिलेला नाही असे सांगितल्याने यावर नाराजी व्यक्त होणार आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 713 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले...
‘ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग’
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 38 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने लाखो...
चंद्र आणि फिरणारे पर्वत: भारत 2023 का विसरु शकत नाही याची सात कारणे
आपण प्रत्येक वर्षाची सुरुवात आशेने करतो, गेलेल्या वर्षाच्या आठवणी आपल्यासोबत घेऊन जातो. जसजसे आपण 2024 कडे वाटचाल...
अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग या संस्थेचे विद्यमान विश्वस्त अॅड. फारूकबी.शेख यांचीअहमदनगर सेंट्रल वकिल बार...
अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग या संस्थेचे विद्यमान विश्वस्त अॅड. फारूकबी.शेख यांचीअहमदनगर सेंट्रल वकिल बार संघटनाचे उपाध्यक्ष पदी एकमतानेनिवड झाल्या बद्दल...