कोरोना लसीकरणासाठी केंद्राने मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर

कोरोना लसीकरणासाठी केंद्राने मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर

केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

नोंदणी केलेल्या लाभार्थीच्या लसीकरणासाठी ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन)’ या डिजिटल यंत्रणेचा वापर करण्यात येईल.

केंद्राने राज्यांसाठी दिल्या मार्गदर्शक सूचना-

एका उत्पादकाची लस एका जिल्ह्य़ासाठी दिली जावी, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.

लसवाहक, लसीच्या कुप्या, शीतपेटय़ा यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.

लाभार्थी लसीकरणासाठी केंद्रावर येईपर्यंत, लस आणि तीव्रता कमी करणारे द्रव (डायल्युअंट) हे लसवाहकामध्ये (व्हॅक्सिन कॅरिअर) झाकणबंद अवस्थेत ठेवले जावे.

30 मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचं निरिक्षण करावे लागणार.

सर्व शीतपेटय़ांसह लस वाहक आणि लसीच्या न उघडलेल्या कुप्या वितरण करणाऱ्या केंद्राकडे परत पाठवल्या जाव्यात.

लसीकरण कर्मचारी चमूमध्ये पाच जणांचा समावेश आवश्यक.

आरोग्य कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आदींचे सर्वप्रथम लसीकरण. लशीच्या उपलब्धतेनुसार इतरांचे लसीकरण.

लसीकरणासाठीच्या प्राधान्य वयोगटांमध्ये 50 वर्षांवरील नागरिकांचे 50 ते 60 आणि 60 वर्षांपुढील असे दोन गट.

प्राधान्य वयोगट निश्चित करण्यासाठी अलीकडच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांचा आधार.

नावनोंदणी-
लसीकरणासाठी लाभार्थ्यांने स्वत: ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन)’ या यंत्रणेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी छायाचित्र असलेल्या 12 ओळखपत्रांची यादी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here