कोरोना तिसरी लाट : बालकांना असणारा धोका लक्षात घेवून यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी टास्क फोर्सची बैठक

764
  • सांगली दि 25 (जि.मा.का) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना असणारा धोका लक्षात घेवून बाधित होणाऱ्या लहान मुलांवर उपचार आणि अनुषंगिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
  • सांगली जिल्ह्यात कोविड-19 ची वाढती संख्या पहाता तसेच संभाव्य तिसरी लाट जुलै ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावास आळा घालणे, या रोगाने बाधित झालेल्या गंभीर व अतिगंभीर बालकांच्या बाबतीत रूग्ण व्यवस्थापन, योग्य औषधोपचार, कोविड रूगणालयात बालरोग विशेषज्ञ डॉक्टर्स, पिडीयाट्रीक इंन्टेसिव्हीस्ट, निओनॅटॉलॉजीस्ट व पॅरामेडिकल स्टाफ तसेच बालरूग्णांसाठी स्थापित केल्या जाणाऱ्या डेडिकेटेड पीडीयाट्रीक कोविड हॉस्पीटल किंवा डेडिकेटेड पिडीयाट्रीक कोविड हेल्थ सेंटर तसेच डेडिकेटेड पिडीयाट्रीक कोविड केअर सेंटर या सर्व संस्थांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री, चिकित्सा करण्यासाठीची आवश्यक उपकरणे इत्यादी बाबत उपाययोजना व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, डॉ. शिषीर मिरगुंडे, डॉ. संभाजी वाघ, डॉ. सतिश अष्टेकर, डॉ. भावेश शहा, डॉ. सारा धनवडे, डॉ. प्रिया प्रभू, डॉ. विनायक पत्की, डॉ. श्रीनिवास, डॉ. अमित तगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज, वॉन्लेस हॉस्पीटल, भारती हॉस्पीटल मिरज या ठिकाणी तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेवून किती बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात येतील तसेच उपलब्ध संबंधित उपचार सामग्री याबद्दलची माहिती यंत्रणांनी त्वरीत द्यावी. तसेच या हॉस्पीटल्सनी उपचारासाठी लागणारी अनुषंगिक औषधे, साहित्य सामग्री आदिंची खरेदी विहीत वेळेत करावी. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण जिलह्यातील बालरोग तज्ज्ञांकडील हॉस्पीटल्सची सूची तयार करण्याबाबत यंत्रणांना निर्देश दिले. जेणेकरून गरजेनुसार ही हॉस्पीटल्स बाधीत बालकांवरील उपचारासाठी आरक्षित करण्यात येतील. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बालरोगतज्ज्ञांचा, शासकीय आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्या वर्कशॉपचे नियोजन करण्यास सांगितले. सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे सुरू असलेल्या टेलिमेडीसीन कक्षाशी जिल्ह्यातील यंत्रणेचा समन्वय प्रस्तापित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
  • लवकर निदान, होम आयशोलेशन याबाबत अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांची भूमिका महत्वाची असून येत्या काळात त्यानांही या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, बालरूग्णालये येथील अनुषंगिक औषधे, वैद्यकीय साहित्य यांची उपलब्धता ठेवण्याचे अनुषंगाने खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्याचेही निर्देशित केले.
  • 00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here