कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले जाणार? केंद्रीय गृह सचिवांचे राज्यांना पत्र

391

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे (Coronavirus) सावट होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील नियंत्रणात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून सर्व राज्य आणि केद्रशासीत प्रदेशांना पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपत्ती निवारण प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गंत (Disaster Management Act) कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे नियम घालून देण्यात आले होते, ते हटवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे. मास्कचा वापर बंधनकारक ठेवायचा की नाही हा निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे देखील या पत्रात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आता कोरोनाची साथ कमी झाल्याने, निर्बंध हटवल्यास आर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांना पत्र पाठवण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य विभागाकडून देशातील एकूण कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्य़ात आला आहे, त्यानंतर केंद्रीय गृह सचिवांकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासीत प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जे आदेश जारी केले आहेत, त्याचा कालावधी संपल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने कोरोना संदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळेवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे. दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर निर्बंधामुळे देशाला मोठा फटका बसला आहे.

गेल्या सात आठवड्यांमध्ये कोरोनाच आलेख झपाट्याने खाली आला आहे. दैनदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता लवकरच कोरोनाचे सर्व निर्बंध समाप्त करण्याचा निर्णय घेऊ शकते. असे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांना पत्र देखील पाठवण्यात आले आहे. कोरोना निर्बंध संपुष्ठात आल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here