कोरोनामुळे RRR प्रदर्शनाची तारीख लांबणीवर,पुन्हा रसिकांना करावी लागणार प्रतिक्षा

398

पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर पुन्हा वाढत आहे.गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.काही महिन्यांपूर्वीच अनलॉक नियमांतर्गत चित्रपट गृहे सुरु झाली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील चित्रपटगृहेही बंद होत आहेत. देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 

दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमावर सर्वांचे लक्ष लागून होते. जेव्हापासून सिनेमाची घोषणा झाली. तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता पुन्हा एकदा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेमुळेच चर्चेत आला आहे. येत्या ७ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे आता पुन्हा एकदा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.

या आधी हा सिनेमा ३० जुलै २०२० साली प्रदर्शित होणार होता मात्र सिनेमावर कोरोनाचे सावट आल्याने सिनेमा लांबणीवर पडला होता.पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारिख कोरोनामुळेच पुढे ढकलण्यात आली आहे.त्यामुळे आता रसिकांना सिनेमासाठी आणखी काही काळ वाट पाहावा लागणार असंच दिसतंय. सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.

नुकतीच ‘जर्सी’चे सिनेमाचीही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ‘जर्सी’ (Jersey Movie)पाठोपाठ आरआरआरचे प्रदर्शनही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आरआरआरच्या प्रदर्शनाच्या तारिख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एस.एस. राजामौली यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात ज्युनियर एनटीआर(Jr,NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here