कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक

395

नवी दिल्ली – जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 76 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 27,409 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,09,358 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (15 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. 347 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,23,127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4,17,60,458 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. 

Omicron ची लक्षणे अतिशय सौम्य असली तरी तो खूप वेगाने पसरत आहे आणि त्याची लक्षणे देखील खूप वेगाने बदलत आहेत. ओमायक्रॉन पाठ सोडत नसल्याचं आता समोर आलं आहे. पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. सामान्य लक्षणे वाढत आहेत. यामुळे सतर्क असणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ओमायक्रॉनची पहिली प्रकरणे नोंदवली गेली, तेव्हा रुग्ण देखील स्नायू दुखण्याची तक्रार करत होते. 

जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत असताना, बहुतेक रुग्णांना नाक वाहणं, अंगदुखी, छातीत दुखणे, पाठदुखी आणि थकवा यासह तीव्र स्नायू दुखणे यासारखी सौम्य लक्षणे जाणवली आहेत. आकडेवारीनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये, ओमायक्रॉन संसर्गामुळे श्वसन समस्या देखील उद्भवत नाहीत. जर तुम्हाला सर्दी-खोकल्यासोबत पाय किंवा शरीरात दुखणे यासारखी विचित्र लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ओमायक्रॉन असल्यास शरीरातील दोन ठिकाणी जास्त त्रास होतो. हे दोन भाग म्हणजे पाय आणि खांदे. यूके झो कोविड स्टडी एपनुसार, गेल्या दोन वर्षांत असे दिसून आले आहे की कोरोना विषाणू शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here